Saturday, September 25, 2010

धुआरी


उदासीन मन
झाले का ये वेळी
आणिकांचे मेळी
सुख न ये

उसळले ढग
आभाळ भरून
आले अंधारून
जग सारे

कोसळे पाउस
सरीवर सरी
दाटली धुआरी
चोहुकडे

तुझा ये आठव
अश्या अवसरी
मूर्ति चितांतरी
उभी राहे

जगात राहून
जगास पारखा
आठवी सारखा
प्रेम तुझे

: अनिल


No comments:

Post a Comment

LinkWithin