३ ऑक्टोबरपासून देशात भरवण्यात येणारी राष्ट्रकुल स्पर्धा आयोजकांवर चांगलीच बेतली आहे. स्पर्धेसाठी आवश्यक असलेले क्रीडांगण, निवासी व्यवस्था आणि प्रेक्षकालये सिद्ध नसल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून आयोजकांवर टीकेचा भडीमार चालू आहे. या स्पर्धा भरवण्याचे दायित्व भारताकडे सात वर्षांपूर्वी सोपवण्यात आले. एवढा मोठा कालावधी भारताला लागला, ही बाबच मुळी अस्वस्थ करणारी आहे, असे या स्पर्धेचे मुख्य कार्र्यकारी अधिकारी माईक हुपर यांनी म्हटले आहे.
हातात भरपूर वेळ असतांना क्रीडासंकुल नियोजनाप्रमाणे तयार नाही आणि या गोष्टीची कारणमीमांसा करतांना उघड झालेले भ्रष्टाचाराचे सूत्र देशाला कलंकित करून गेले. हुपर हे स्वतः या क्रीडासंकुलाच्या सिद्धतेविषयी सतर्क होते आणि ते दोन वर्षांपूर्वी, तसेच दोन महिन्यांपूर्वी भारतात येऊन गेले होते. परदेशात राहू [...]
No comments:
Post a Comment