Saturday, September 25, 2010

उद्या

उद्या उद्या तुझ्यामध्येच
फाकणार न उद्या
तुझ्यामध्येच संपणार
ना कधीतरी निशा

उद्या तुझी धरून कास
आज कार्य आखले
तुझ्यावरी विसंबुनी
कितीक काम टाकले

उद्या तुझ्याचसाठी आज
आजचे न पाहतो
तुझ्याचकडे लावुनी
सद्देव दृष्टी राहतो

उद्या तुझ्यासवे निवांत
आजचा अशांत मी
उद्या तुझ्यामुळेच जिवंत
आजचा निराश मी

: अनिल


No comments:

Post a Comment

LinkWithin