
निरोपाच्या वेळी...
असे गुंतवायचे नाहीत हातात हात
फक्त स्पर्श सांभाळायचा
मखमली ह्रुदयात...
निरोपाच्या वेळी...
असे मोजायचे नाहीत मागचे क्षण
धुवून पुसून साफ़ ठेवायचे
झाले गेलेले व्रण
निरोपाच्या वेळी...
असे थांबवायचे नाही एकमेकांना
वाटेवर अंथरायच
आपल्या जवळच्या गोड फुलांना
निरोपाच्या वेळी...
नेहमीच एक करायच...
समोरच्याच डोळ्यातल पाणी
आपल्या डोळ्यात घ्यायाच.....
No comments:
Post a Comment