अन्वेषण यंत्रणेचे प्रमुख अधिकारी सोडून गेले, तर गोवा पोलीस कंटाळले
मडगाव, २४ सप्टेंबर (वार्ता.) - येथे झालेल्या स्फोट प्रकरणाचे अन्वेषण करणार्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे (एन्आयए) वरिष्ठ अधिकारी असलेले अधीक्षक विजयन हे येथील दायित्व सोडून केरळ येथे पूर्ववत् पोलीस खात्यात रूजू झाले आहेत. केंद्रीय गृह खात्याकडून दबाव आणि हस्तक्षेप होत असल्याने नि:पक्षपातीपणे चौकशी करता येत नाही, या कारणासाठी येथील दायित्व त्यांनी सोडले आहे, तसेच राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या जाचाला गोवा पोलीस खात्यातील अधिकारी कंटाळले आहेत. या अन्वेषण यंत्रणेशी निगडित गोवा पोलीस खात्यातील काही पोलीस उपनिरीक्षकांनी या यंत्रणेतून आपली मुक्तता करून घेतली आहे, असे वृत्त दैनिक 'गोवा दूत'ने आज प्रसिद्ध केले आहे.
गेल्या वर्षी दीपावलीच्या पूर्वसंध्ये� [...]
No comments:
Post a Comment