आज हरतालिका किंवा बोलीभाषेत हरताळका आहे. देवीची पूजा तिच्या अनेक रूपात केली जाते, विशेषतः काली, दुर्गा, चामुंडा आदि रूपांमध्ये ती दुष्टांचा नाश करतांना दिसते, तर लक्ष्मीच्या रूपात सुखसंपत्ती देणारी आणि सरस्वती किंवा शारदेच्या रूपात ती विद्यादायिनी किंवा कलेची अधिष्ठात्री असते. या इतर रूपांमध्ये स्त्री व पुरुष दोघेही तिची आराधना करतात, पण हरताळका, मंगळागौर वगैरे कांही व्रते मात्र खास स्त्रीवर्गासाठी राखून ठेवल्या आहेत. त्यात त्यांचेसाठी १०० टक्के आरक्षण असते. अविवाहित मुली आपल्या मनासारखा वर मिळावा म्हणून हे व्रत करतात आणि विवाहित स्त्रिया मिळालेला नवरा सोबत रहावा म्हणून ती चालू ठेवतात. या दिवशी देवी पार्वतीची पूजा कराय़चे मुख्य कारण म्हणजे तिने अशी मनोकामना धरली आणि ती पूर्ण करून दाखवली. त्यामुळे तिचे वरदान मिळाल्यावर आपली इच्छा पूर्ण करायला [...]
No comments:
Post a Comment