मॅच फिक्सिंग म्हणजे संपूर्ण सामन्याचा निकाल फिक्स करणे.क्रिकेट रसिकांची ही खुली फसवणुक असते. मँच फिक्सिंग, बेटिंग, डोपिंग, स्लेजिंग अशा अनेक अपप्रवृत्ती क्रिक़ेट खेळात आल्या आहेत.गेले दशकभर मॅच फिक्सिंग हे दोन शब्द धुमाकुळ घालताहेत. अझरुद्दिन, जडेजा, क्रोनिए वगैरे गुणी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ही कायमस्वरूपी भेट आहे. सट्टेबाज, गुंड आणि राजकारणी यांच्या अभेद युतीतून मॅच फिक्सिंगचा अपप्रकार जन्माला आला आहे. त्यामुळे सामन्यांचे निकाल आजकाल मैदानात न लागता मैदानाबाहेरच लागतात. क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग हा प्रकारच अस्तित्वात नाही असे काही जण म्हणत असतात. तर मॅच फिक्सिंगशिवाय क्रिकेट सामना पूर्णच होऊ शकत नाही असे काहींचे म्हणणे असते.क्रिकेट हा आता पैशाचा खेळ झाला असून, सट्टेबाजांच्या मर्जीनुसार क्रिकेटपटूंना खे [...]
No comments:
Post a Comment