Sunday, September 26, 2010

दोन फुल एक हाफ

खालील लेख हा लोकसत्ता च्या लोकरंग ह्या पुरवणीतून घेतला आहे ......

विनोद



दोन फुल

'तवंग कुठे आहे?'
'साहेब, तो बघा तवंग. दिसला का?'
'नाही दिसला बुवा. तुम्ही कुठे पाहता आहात तेच कळत नाही मला!'
'डावीकडे बघा साहेब, मग जरासं उजवीकडे. हं, आता दिसला? तो जो काळपट रंगाचा पट्टा दिसतो ना, तोच तवंग आहे. दिसला?'
'थांबा, थांबा. जरा नीट बघू द्या. हे हेलिकॉप्टर फार हलतं बुवा, त्यामुळं त्रास होतो. कुठं म्हणता? डावीकडे? अच्छा. थांबा थांबा, दिसला मला तवंग. अरे बापरे! केवढा मोठा काळा पट्टा आहे तवंगाचा! आणि त्या तवंगाच्या अगदी बाजूलाच ताजमहाल हॉटेल आहे. ते तेल हॉटेलमध्येही जाऊ शकतं..!'
'ताजमहालच्या बाजूला? साहेब, तुम्ही नेमकं काय बघता आहात? अहो साहेब, जो काळपट पट्टा तुम्ह� [...]

No comments:

Post a Comment

LinkWithin