नवी दिल्ली - येत्या ऑक्टोबरपासून नवी दिल्लीत चालू होणार्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटनाला ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ उपस्थित रहाणार नाही. त्यामुळे स्पर्धेचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती सौ. प्रतिभा पाटील यांच्या हस्ते करण्याच्या भारताच्या मागणीला ब्रिटनने विरोध केला असून स्पर्धेचे उद्घाटन राजकुमार चार्ल्स यांच्या हस्ते करण्यात येईल, असे घोषित केले आहे. राष्ट्रपती या वेळी उद्घाटनाचा संदेश वाचून दाखवतील आणि राजकुमार चार्ल्स यांना 'स्पर्धा चालू करावी का', असा औपचारिक प्रश्न विचारतील. यानंतर चार्ल्स महाराणी एलिझाबेथ यांचा संदेश वाचून दाखवतील.
ब्रिटिशांनी राज्य केलेल्या गुलाम देशांमधील क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यास भारताच्या राष्ट्रपतींना विरोध करून ब्रिटनने भारत आणि अन्य राष्ट्रे अद्यापही ब्रिटनचे गुलाम आहेत, असे � [...]
No comments:
Post a Comment